26/05/2025
Movie Review-
कधी वाटले नव्हते हे करेन. पण आता करतोय…
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत, घरी सगळेच होते मग अचानक मनात आले की, पावसामुळे कुठे बाहेर जाऊ शकलो नाही, त्यांच्या सोबत पिक्चर ला तर जाऊया कोणत्या तर.. मग फॅमेली सोबत जायच, तर मराठी मूवी हुडकली आणि मग ठरले sfc ला ५.०० चा शो आहे. “आता नाही थांबायचं.” चला मग त्यालाच जाऊ.. असेपण भरत जाधव सरांना बघत मोठे झालोय आणि सिद्धार्थ जाधव साहेबांची कॉमेडी आपल्याला आवडते. मग ठरल चला जाऊ.. मूवीला जाई पर्यंत सगळे नॉर्मल होते.. पण जसा मूवी सुरु झाला तसा पात्रानी आम्हाला त्या मूवी मध्ये रेंगाळून घ्यायला सुरवात केली. स्टोरी आहे बीएमसी च्या कामगारांची पण त्यांचं कष्ट, चिकाटी आणि त्यांच्या सोबत होणारा अन्याय बघून मन शहारुन जाते. जसा जसा मूवी पुढे जातो तस तसा तो तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. तुम्हाला त्यांच्या दुःखा- सुखासोबत attach करतो.. कलाकारांची करेल तेवढी स्तुती कमी पडेल असा हा चित्रपट तुम्हाला खूप काही गोष्टी शिवतो.
यात मी जे प्रामुख्याने शिकलो ते- कितीही अडचणी येउदेत त्याला आपण मात करू शकतो. या चित्रपटाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक संदेश खऱ्या स्वरूपात सादर केल आहे. की तुम्ही शिकला, संघटित झाला आणि संघर्ष केला तर तुम्हाला यश नक्की भेटते आणि तुम्ही शिकून काय करणार याच देखील उत्तर हा चित्रपट तुम्हाला देतो.
एकाच चित्रपटात तुम्हाला शिक्षण, आरोग्य, श्रम, कौटुंबिक जडणघडण, आणि कष्ट या सगळ्याचे महत्त्व सांगत तुम्हाला त्याच्या मधल्या सुट्टी नंतच्या काही दृष्यमुळे डोळ्यात पाणी आणणार हा चित्रपट तुम्ही एकदा तर नक्की बघावा.. असे वाटतं आहे ना-माझ्याच आयुषात जगातले सगळे problem आहेत? मग तर हा चित्रपट नक्की बघा.. तुम्हाला समजेल जिद्द सोडली नाही. आणि प्रामाणिक कष्ट केलं तर सगळे शक्य होते.
thank you