Savitri Forum,Pune.

Savitri Forum,Pune. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Savitri Forum,Pune., Legal Service, Savitri Forum , c/o T-10 Hemkunj , Florida Estate, , Mundhwa, , Keshvnagar, , Pune 411036, Pune.

सावित्री फोरम च्या "विद्यानिधी" या शैक्षणिक मदतीच्या कार्यक्रमाची आणि "सावित्री पुरस्कार" या सोहळ्याची पुणे आणि नाशिक ये...
07/07/2026

सावित्री फोरम च्या "विद्यानिधी" या शैक्षणिक मदतीच्या कार्यक्रमाची आणि "सावित्री पुरस्कार" या सोहळ्याची पुणे आणि नाशिक येथील नावाजलेल्या वृत्तपत्रांनी दखल घेतली.
Growing to help...
Helping to grow....
हे आमचे ब्रीदवाक्य आहे. त्याप्रमाणे समाजासाठी काम करण्याकरिता सावित्री फोरम च्या सर्व सख्या कायम पुढे असतात.

‘सावित्री फोरम’तर्फे नाशिक येथील डॉ. प्रा. सौ. सिंधू काकडे यांना आदिवासी मुली, अंध मुली यांच्यासाठी करीत असलेल्या कार्या...
04/07/2026

‘सावित्री फोरम’तर्फे नाशिक येथील डॉ. प्रा. सौ. सिंधू काकडे यांना आदिवासी मुली, अंध मुली यांच्यासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल ‘सावित्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
5000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
ज्येष्ठ शास्रज्ञ् श्री. राजेश माळी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला.
याबरोबरच सावित्री फोरम तर्फे दरवर्षी "विद्यानिधी" योजने अंतर्गत ९५ विद्यार्थिनींना एकूण सुमारे दोन लाख रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात आली.
हा कार्यक्रम शनिवार दिनांक ४जुलै रोजी दुपारी १२ वाजता जवाहरलाल नेहरु ऑडिटोरिअम, घोले रोड, पुणे येथे संपन्न झाला.
यावेळी सावित्री फोरमच्या अध्यक्ष मोनाली कोद्रे,सचिव संयोगिता कुदळे , खजिनदार अनिता ढोले पाटील आणि सर्व सभासद उपस्थित होते.
परिस्थिती ची तमा न बाळगता शिक्षण घ्या आणि स्वतः चे अस्तित्व निर्माण करा असे पुरस्कारार्थी डॉ.सिंधुताई काकडे यांनी सांगितले.
तर प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक होण्यास प्रवृत्त करावे असे प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ् राजेश माळी यांनी सांगितले.
सन २०१५मध्ये ही संस्था नोंदणीकृत ट्रस्ट म्हणून स्थापन केली. तेव्हापासून दरवर्षी सरासरी ८० ते १०० मुलींना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
"सावित्री"पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.
पुरस्कारार्थी यांची ओळख दिपाली पांढरे यांनी तर प्रमुख पाहुण्यांची ओळख अश्विनी बोरुडे यांनी करून दिली.
आभारप्रदर्शन शैलजा माळी यांनी केले.

03/07/2026
जागतिक महिला दिना निमित्ताने दिनांक 8 मार्च रोजी सावित्री फोरम यांनी नोबेल हॉस्पिटल,हडपसर यांच्या ब्लड बँकेच्या सहकार्या...
09/03/2026

जागतिक महिला दिना निमित्ताने दिनांक 8 मार्च रोजी सावित्री फोरम यांनी नोबेल हॉस्पिटल,हडपसर यांच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगरसेवक पुनीत जोशी यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.
सावित्री फोरम सर्व रक्तदाते, शुभेच्छुक, नोबेल हॉस्पिटल ब्लड बँकेचा सगळा स्टाफ यांचे मनापासून आभारी आहे.

अभिजात मराठी भाषा आणि मराठी शाळा या दोन गोष्टी वाचवायच्या असतील आणि त्या वाचल्याच पाहिजेत असे ज्याला वाटते त्यांनी आवर्ज...
04/02/2026

अभिजात मराठी भाषा आणि मराठी शाळा या दोन गोष्टी वाचवायच्या असतील आणि त्या वाचल्याच पाहिजेत असे ज्याला वाटते त्यांनी आवर्जून पहावा असा चित्रपट म्हणजे..
“क्रांतीज्योती विद्यालय,मराठी माध्यम."
हा चित्रपट आज सावित्री फोरम तर्फे सख्यांना दाखविण्यात आला.
लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षिती जोग आणि सर्व कलाकार यांचे अभिनंदन कारण,
मराठी भाषा आणि मराठी शाळा हा खरंतर गंभीर विषय असूनही इतका हलका फुलका चित्रपट काढला आणि त्यामुळे हा विषय सर्वांच्या च मनात जागरूकता निर्माण करतो... विचार करायला भाग पाडतो.
सर्वच कलाकारांचे अभिनंदन.. सर्वांनी धमाल भूमिका केल्या आहेत.नकळत आपण आपल्या शाळेच्या दिवसातल्या सोनेरी आठवणींच्या जगात फेरफटका मारून येतो.
या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी शाळेतले शिक्षण आणि आपली माय मराठी भाषा या बद्दलचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत ही अपेक्षा. 😊

सावित्री फोरम च्या सख्यांचे हळदी कुंकू, "कल्याण ज्वेलर्स, कर्वे रोड" येथे उत्साहात साजरे झाले.या निमित्ताने सौ. श्रेया व...
22/01/2026

सावित्री फोरम च्या सख्यांचे हळदी कुंकू, "कल्याण ज्वेलर्स, कर्वे रोड" येथे उत्साहात साजरे झाले.
या निमित्ताने सौ. श्रेया वैद्य यांनी रत्ने व खडे या बद्दलची उपयुक्त माहिती दिली.
या व्यवसायात त्यांचा 25 वर्षाचा अनुभव आहे. आपले लाडके सुपरस्टार अमिताभ बच्चन जी यांनी सुद्धा सौ. श्रेयाजींचा सल्ला घेतला आहे.
(सौ. श्रेया वैद्य यांचा मोबाईल नंबर- 80876 14516.)
श्री. सुमित यांनी कल्याण ज्वेलर्स च्या भिशी सह अनेक योजनांची माहिती दिली.
गप्पा आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Address

Savitri Forum , C/o T-10 Hemkunj , Florida Estate, , Mundhwa, , Keshvnagar, , Pune 411036
Pune
411036.

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savitri Forum,Pune. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category