Barge And Barge Associates 2

Call Directions Contact the business

Barge And Barge Associates 2 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Barge And Barge Associates 2, Lawyer & Law Firm, Baramati, Pune.

28/09/2026
"खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन, भारत सरकार असे फलक लावता येत नाहीत."*१. मोटार वाहन कायदा १९८८ - कलम १३४ आणि महाराष्ट्र श...
28/09/2026

"खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन, भारत सरकार असे फलक लावता येत नाहीत."

*१. मोटार वाहन कायदा १९८८ - कलम १३४ आणि महाराष्ट्र शासन परिपत्रक:*
फक्त शासनाच्या मालकीच्या वाहनावरच "महाराष्ट्र शासन" / "Government of Maharashtra" असा फलक लावता येतो, आणि त्यावर कोणत्या विभागाचे वाहन आहे ते लिहिणे बंधनकारक आहे. खाजगी ठेकेदाराच्या किंवा भाड्याने घेतलेल्या वाहनावर असा बोर्ड लावता येत नाही.

*२. मुंबई हायकोर्टाचा आदेश (२०१९):*
खाजगी वाहनावर "पोलीस", "महाराष्ट्र शासन", "भारत सरकार" असे लिहिणे, लोगो लावणे, स्टिकर लावणे बेकायदेशीर आहे, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. असे केल्यास कारवाई होऊ शकते.

*३. कोणाला परवानगी नाही:*
- सरपंच, नगरसेवक, सभापती, पदाधिकारी, पत्रकार, कार्यकर्ता, निवृत्त अधिकारी यांच्या खाजगी गाडीवर
- पोलीस / शासकीय कर्मचाऱ्याच्या खाजगी गाडीवर सुद्धा नाही - फक्त पोलीस खात्याच्या शासकीय मालकीच्या वाहनावरच परवानगी आहे.

पुण्यात आणि नागपूरमध्ये GAD ने अशा फलकांवर कारवाई करून फलक काढले आहेत.

*तक्रार कुठे करावी:*
- RTO - १८००२२०११०
- वाहतूक पोलीस व्हॉट्सअॅप - ८४५४९९९९९९ (मुंबई) / स्थानिक वाहतूक शाखा
- कोणताही नागरिक स्वतः MahaTraffic App वर फोटो सकट तक्रार करू शकता.

मेसेज करा, सदस्य व्हा: 79000 40367
*-अखिल भारतीय ग्राहक पंचायत*

चेक न वटल्याच्या खटल्यात आरोपीस   तब्बल सत्यान्नव  लाख रूपये नुकसानभरपाई  देण्याचा आदेश व तीन महिना तुरुंगवासाची शिक्षा ...
24/09/2026

चेक न वटल्याच्या खटल्यात आरोपीस तब्बल सत्यान्नव लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश व तीन महिना तुरुंगवासाची शिक्षा !

पुणे येथील मे. सिव्हिल जज्ज सीनियर डिव्हिजन व प्रमुख न्यायदंडाधिकारी श्री आनंद एस. मुंढे साहेब यांनी आरोपी स्पंदन मेडिकेअर चे प्रोप्रारायटर श्री जगदीश बाजीराव कदम रा. समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे याना तारीख 21/9/2026 रोजी तुरुंगवास, नुकसानभरपाई रक्कम रुपये 97,00,000 फिर्यादीला देण्याचा आदेश दिला.

फिर्यादी युनायटेड मेडिकल सोलूशन कंपनी तर्फे जयदीप दत्ताराम कुंभार रा. वारजे. पुणे यांनी सदर खाजगी तक्रार कोर्टात दाखल केली होती.

आरोपी व फिर्यादी हे व्यावसायिक मित्र होते. फिर्यादी यांची मेडिकल व्यवसायसाठी लागणारी मशिनरी पुरवण्याची फर्म होती. आरोपीने वेळोवेळी अशी मशिनरी फिर्यादी कडून घेतली होती. परंतु त्याची परतफेडीची रक्कम वेळेत देता आली नव्हती. त्यामुळे त्याने त्यांच्या परतफेडीच्या पोटी रुपये 88,59,903 चा चेक फिर्यादी याना लिहून व सही करून दिला. व चेक वटेल अशी हमी दिली होती.
फिर्यादीने तो चेक स्वतः च्या बँक खात्यावर भरला असता तो न वटता परत आला. त्यामुळे फिर्यादी यांनी *अँड विशाल विजयकुमार बर्गे रा. बारामती* यांच्या मार्फत फौजदारी खटला पुणे कोर्टात दाखल केला होता.

आरोपीने असा बचाव घेतला होता की, फिर्यादी याला सदर रक्कमेची परतफेड करून रक्कम दिलेली आहे. परंतु मुद्दाम पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा खोटा खटला दाखल केला आहे.
फिर्यादी तर्फे *अ‍ॅड विशाल बर्गे* यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, चेक बाबत फिर्यादी गैरवापर करू नये म्हणुन आरोपीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही अथवा त्याच्या बॅंकेत जाऊन चेक बाबत स्टॉप पेमेंट केले नाही. तसेच वकिलांच्या नोटिशीला तत्काळ उत्तर देऊन स्वताची बाजू मांडली नाही. आरोपीने चेक वरील सही नाकारली नाही . या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निकाल फिर्यादीचे वकील *श्री अँड विशाल बर्गे* यांनी कोर्टात सादर केले.

हा अँड विशाल बर्गे यांचा युक्तिवाद मान्य करून मे कोर्टाने आरोपीस तुरूंगवास, दंड तसेच नुकसानभरपाई देण्याचा आदेश तारीख 21/9/2026 रोजी दिला.

लाचखोरीच्या गंभीर प्रश्नावर अत्यंत निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि वास्तवदर्शी भाष्य केले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार...
16/09/2026

लाचखोरीच्या गंभीर प्रश्नावर अत्यंत निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि वास्तवदर्शी भाष्य केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतरच्या प्रक्रियेतील विलंब, प्रलंबित प्रकरणे आणि पुन्हा सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे.
गेल्या दहा वर्षांची विभागनिहाय व जिल्हानिहाय आकडेवारी सार्वजनिक करण्याची मागणी ही पारदर्शक प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्नांना लेखाने स्पष्ट आणि परखड शब्दांत वाचा फोडली आहे.भ्रष्टाचाराविरोधातील लढा केवळ सापळ्यांपुरता मर्यादित न राहता अंतिम निकालापर्यंत कालबद्ध असावा, हा लेखाचा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश आहे.
सजग नागरिकांच्या वतीने प्रशासनाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा हा लेख निश्चितच कौतुकास्पद आणि विचारप्रवर्तक आहे. जागरुक नागरिकांनी हा लेख आवर्जुन सगळीकडे शेअर करावा ही विनंती

Sudhir Laxmikant Dani 👍👍🌹

05/09/2026

शिक्षक दिनी सरन्यायाधीशांची मोठी घोषणा! सर्वोच्च न्यायालयात आता दरमहा ‘ज्ञानाची न्यायशाळा’ — तरुण वकिलांसह कायदे विद्यार्थ्यांना थेट संवादाची संधी

‘One Important Idea. Every Month’ : कायदा, न्यायव्यवस्था आणि कायदे शिक्षणावर मान्यवरांची व्याख्यानमाला; ‘न्याय शिक्षण सन्मान’ पुरस्काराचीही घोषणा

नवी दिल्ली : शिक्षक दिनाचे औचित्य साधत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदा, न्यायव्यवस्था आणि कायदे शिक्षण या विषयांवर दरमहा विशेष व्याख्यानमाला सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘One Important Idea. Every Month’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून कायदे क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विचार देशभरातील विद्यार्थी, तरुण वकील आणि संशोधकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नामवंत तज्ज्ञांचे व्याख्यान, त्यानंतर ‘Ideas Dialogue’

या व्याख्यानमालेच्या प्रत्येक भागात नामवंत न्यायमूर्ती, विधिज्ञ, कायदेपंडित, कायदे शिक्षणतज्ज्ञ तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. व्याख्यानानंतर ‘Ideas Dialogue’ या चर्चासत्राचे आयोजन केले जाणार असून, त्यामध्ये तरुण वकील, कायद्याचे विद्यार्थी आणि संशोधकांना वक्त्यांशी थेट संवाद साधण्याची तसेच प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.
यामुळे केवळ व्याख्यान ऐकण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता विचारांची देवाणघेवाण आणि न्यायव्यवस्थेवरील सखोल चर्चा घडवून आणण्याचे व्यासपीठ ठरणार आहे.

व्याख्यानांचा कायमस्वरूपी डिजिटल संग्रह

या व्याख्यानांचे व्यावसायिक पद्धतीने ध्वनिचित्रण करण्यात येणार आहे. त्यांचे संपादित लिप्यंतरण तसेच संक्षिप्त ‘Ideas Papers’ तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
व्याख्याने थेट प्रक्षेपित करण्याचे नियोजन असून, देशाच्या विविध भागांतील कायदे विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना त्याचा लाभ मिळावा यासाठी भारतीय भाषांमध्ये व्याख्यानांचे सारांश उपलब्ध करून देण्याची योजनाही आखण्यात आली आहे.

१४ सप्टेंबरपासून सुरुवात

या महत्त्वाकांक्षी व्याख्यानमालेचा पहिला कार्यक्रम सप्टेंबर २०२६ मध्ये होणार असून, त्यानंतर दर महिन्याला एक व्याख्यान आयोजित करण्याचे नियोजन आहे.
यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कायदा आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित उच्च दर्जाचे ज्ञान नियमितपणे उपलब्ध होण्याची संधी कायदे क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि नवोदितांना मिळणार आहे.

कायदे शिक्षणातील योगदानासाठी ‘न्याय शिक्षण सन्मान’

याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने ‘Supreme Court Nyaya Shiksha Samman’ हा वार्षिक पुरस्कार सुरू करण्याचा प्रस्तावही जाहीर केला आहे.
कायदे शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जाणार आहे. हा पुरस्कार आर्थिक स्वरूपाचा नसून, कायदे शिक्षणातील उत्कृष्ट योगदानाची संस्थात्मक दखल घेणारा प्रतिष्ठेचा सन्मान असेल.
दरवर्षी शिक्षक दिनाच्या आसपास एक किंवा दोन मान्यवर कायदे शिक्षणतज्ज्ञांची या पुरस्कारासाठी निवड केली जाण्याची शक्यता आहे. व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पहिला पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

तरुण पिढीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे नवे बौद्धिक व्यासपीठ

या उपक्रमामागे कायदे क्षेत्रात सखोल विचार, अर्थपूर्ण संवाद, तरुणांचा सक्रिय सहभाग आणि न्यायव्यवस्थेविषयी व्यापक बौद्धिक चर्चा यांना चालना देण्याचा उद्देश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या उपक्रमामुळे कायदे विद्यार्थी, तरुण वकील, संशोधक आणि कायदे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना एका समान व्यासपीठावर येण्याची संधी मिळणार असून, भारतीय न्यायव्यवस्थेच्या ज्ञानपरंपरेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Address

Baramati
Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918669174416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Barge And Barge Associates 2 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Barge And Barge Associates 2:

Shortcuts

Share