05/06/2026
🌳जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण अभियान
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दिलेल्या “एक पेड माँ के नाम” या आव्हानाला प्रतिसाद देत आणि आमचे मार्गदर्शक, चिंचवड विधानसभेचे आमदार मा.श्री.शंकरभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रहाटणी प्रभाग क्रमांक २७ च्या वतीने भव्य वृक्षारोपण अभियान संपन्न झाले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान (रहाटणी) व बुद्ध विहार (तापकीरनगर) येथे वड, पिंपळ, कडुनिंब यांसारख्या औषधी व दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या संगोपनाची आणि जतनाची शपथही यावेळी घेण्यात आली.
या वृक्षारोपण प्रसंगी प्रभाग क्रमांक २७ मधील सहकारी नगरसेवक, रहाटणी-पिंपळे सौदागर मंडळ अध्यक्ष भाजपा, बुद्धविहार मधील ज्येष्ठ नागरिक, महिला व धर्मवीर संभाजी गार्डन ग्रुपचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.