Advocate supriya vishal barge

07/06/2026




077190 50353

, #बारामती

 #महिला_सुरक्षा_हा_आजही_गंभीर_विषय_आहे.  महिला भावनिक असतात, त्या  पटकन विश्वास ठेवतात, ज्याच्यावर त्यांचा विश्वास आहे त...
29/03/2026

#महिला_सुरक्षा_हा_आजही_गंभीर_विषय_आहे.

महिला भावनिक असतात, त्या पटकन विश्वास ठेवतात, ज्याच्यावर त्यांचा विश्वास आहे तो कोणीही त्यांना आपल्या भ्रमाच्या जाळ्यात सहज ओढू शकतो व त्यांच्याकडून अनैतिक व समाज्याच्या,कायद्याच्या विरोधात अनेक गोष्टी करून घेऊ शकतो.

आजही मुलगी वयात आली की आई वडीलांना तिच्या करियर पेक्षा जास्त तिच्या सुरक्षेची काळजी वाटते, अश्यातच मुली 18 पूर्ण झाल्या की पळून जाण्याच्या आणि आई वडिलांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी देण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे.

महिलांचा व्यवसाय,नोकरी निमित्ताने समाजातील अनेक घटकांशी संपर्क येतो आणि वाईट प्रवृत्तीचे लोक त्यांच्या शरीराचा , पैश्याचा, पदाचा, स्वतःच्या फायद्यासाठी दुरुपयोग करतात.

मोबाईल मुळे महिलांशी अनोळखी व्यक्ती सहज संपर्क साधू शकते, त्यामुळे सायबर गुन्हा वाढत आहे, महिलांच्या अकाउंट मधून पैसे गायब करणे, अश्लील फोटो व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅक मेल करने, महिलांना लाज वाटेल अश्या प्रकारच्या मागण्या करणे असे प्रकार वाढले आहेत.

अश्या दृष्ट वाईट प्रवृत्तीच्या लोकांना ओळखुन त्यांच्यापासून लांब राहणे हे महिलांना जमलेच पाहिजे कारण स्वतःच्या जीवापेक्षा, स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा मोठे या जगात काहीच नाही.

विश्वास ठेवायाचाच असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावर ठेवा. आपल्या आई वडिलांवर ठेवा.

वाईट इतकेच वाटते की खूप सारे कायदे महिलांसाठी बनविले आहेत परंतु घरची इज्जत, संसार तुटण्याची भीती, नोकरी गमावण्याची भीती महिलांना असते. समाज्यात वावरताना अगदी सहज महिलांच्या चरित्रावर बोलले जाते .

शिक्षण, नोकरीच्या ठिकाणी इंटर्नल कंप्लेंट कमिटी असूनही महिला इज्जातीला घाबरून तक्रार देत नाही. आणि चुकून तक्रार दिलीच आरोपीला शिक्षा होण्याऐवजी पैशांच्या स्वरूपात महिलेला नुकसानभरपाई दिली जाते.

महिलांविषयक कायद्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करावी. कायद्याची भीती फसव्या
भोंदू, दृष्ट, गुंड ,प्रवृत्तीच्या व्यक्तींना वाटावी अशी जलद शिक्षेची तरतूद असावी, मुलींचे अपहरण, विनयभंग, बलात्कार रोखले जावेत, अपहरण झालेल्या मुलांचा शोध लवकरात लवकर घ्यावा.

अशी नम्र विनंती या महाराष्ट्राच्या सरकारला एक महिला वकील म्हणून करीत आहे.

समाजातील प्रत्येकाने अशी मागणी केल्यास कडक कायद्याची जलद अंमलबजावणी होईल ही अपेक्षा.

गेल्या 18 वर्षांच्या वकिली व्यवसायातील अनुभवाने आणी सामाजिक कार्याच्या जाणीवेतून यशश्री फाउंडेशन या माध्यमातून अनेक महिला, मुलींना मदत करीत असते

कोणत्याही महिलेला कधीही कायदेविषयक मदत माहिती सल्ला हवा असल्यास माझ्याशी संपर्क करू शकता. आपली सर्व माहिती गुप्त ठेवली जाईल व महिलांना आवश्यक मदत केली जाईल.

#टीप =
केवळ महिलांवरच अन्याय,अत्याचार होतो असे नाही तर कित्येक वेळा पुरुषांना सुद्धा नाहक त्रास आपल्यातील काही विक्षिप्त महिलांमुळे सहन करावा लागतो.

खोट्या विनयभंगाच्या, हुंडाबळीच्या केसेस दाखल केल्याने पुरुषांचे संपूर्ण आयुष्य कोर्ट कचेरीत जाते. त्यांच्या कुटुंबियांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागते.

असे प्रकार महिलांनीही करू नयेत ही नम्र विनंती.

ुप्रिया_विशाल_बर्गे 077190 50353

18/03/2026

सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सायन्स कॉलेज सोमेश्वरनगर येथे ॲड सुप्रिया बर्गे यांनी POSH Act बद्दल मार्गदर्शन केले. Adv Supriya Barge
077190 50353

09/03/2026

ॲड सुप्रिया विशाल बर्गे या गेल्या आठरा वर्षापासून बारामती, पुणे कोर्ट येथे वकिली व्यवसाय करतात. त्या यशश्री फाउंडेशन च्या अध्यक्ष असून सामाजिक जाणीवेतून महिलांना कायदेविषयक जनजागृती, सल्ला,मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. त्या मध्यस्थ वकील म्हणून काम करीत असताना अनेक घटस्पोट, कौटुंबिक हिंसाचार, शेतीविषयक वाद कोर्ट प्रकरणे, त्यांनी शिताफीने हाताळली आहेत. जलद गतीने न्याय मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात, त्या पती पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी कौटुंबिक समुपदेशनाचे कार्य करतात. त्यांच्या या कार्यास त्यांचे पती ॲड विशाल बर्गे यांची मोलाची साथ सहकार्य लाभते.
महिला दिनानिमित्ताने पांढरेवाडी ग्रामपंचायतने adv.सुप्रिया विशाल बर्गे यांना त्यांच्या वकिली व्यावसातील कार्याचा गौरव करीत सन्मानित केले.


. 077190 50353

Address

Pune
412112

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917719050353

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Advocate supriya vishal barge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Advocate supriya vishal barge:

Shortcuts

Share