Legal foresight law firm

Legal foresight law firm legal consultancy services

वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणजे काय ?आपल्यापैकी अनेक लोकांनी वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणजेच सक्सेशन सर्टिफिकिट ( Succession ...
20/11/2021

वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणजे काय ?
आपल्यापैकी अनेक लोकांनी वारसा हक्क प्रमाणपत्र म्हणजेच सक्सेशन सर्टिफिकिट ( Succession Certificate ) आणि हेअरशिप सर्टिफिकिट ( Heirship Certificate ) हे शब्द अनेक वेळा ऐकले असतील आणि अशी प्रमाणपत्र नसतील तर अनेकवेळा मिळकतींचे व्यवहार देखील अडल्याचे अनुभवले असेल . अश्या प्रमाणपत्रांची गरज कधी पडू शकते ? ‘ एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीचे वारस कोण हे ठरविणे ‘ हा सक्सेशन सर्टिफिकिट आणि हेअरशिप सर्टिफिकिट ह्यांचा उद्देश जरी एकच असला तरी त्यांची गरज वेगवेगळ्या प्रसंगी पडते . म्हणजेच जंगम ( मुव्हेबल ) मिळकतींबाबत म्हणजेच ( सिक्युरिटी / डेट्स ) बँक खाती , मुदत ठेवी , शेअर्स , प्रोमिसरी नोट , डिबेंचर्स पीपीएफ खाते , बँक लॉकर अश्या साठी सक्सेशन सर्टिफिकेटची गरज पडते , तर स्थावर ( इममुव्हेबल ) म्हणजेच घर , जमीन , दुकान ह्या मिळकतींसाठी हेअरशिप सर्टीफिकेट घ्यावे लागते . एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मिळकतींचे विभाजन हे मयत व्यक्तीच्या मृत्यूपत्राप्रमाणे ( टेस्टॅमेंटरी ) किंवा जर मृत्यूपत्र नसेल तर वारसा – हक्का प्रमाणे ( नॉन – टेस्टॅमेंटरी ) होते . मृत्युपत्र केले असेल तर आपोआपच वारसा हक्क कायदा लागू होत नाही . पण जर का मृत्यूपत्र केले नसेल किंवा एखादी मिळकत काही कारणाने मृत्युपत्रात नमूद करायची राहून गेल्यास , वारसा हक्क कायदा लागू होतो , पण अश्या वेळी मयत व्यक्तीचे वारस कोण असा प्रश्न बँक , पोस्ट इ . ठिकाणी उपस्थित होतो . केवळ नॉमिनेशन केले असेल तरी हा प्रश्न सुटत नाही , कारण नॉमिनी हा केवळ एक ट्रस्टी असतो , मालक नाही . अश्या सक्षम कोर्टाकडून सक्सेशन सर्टिफिकेट वेळी मिळवणे गरजेचे ठरते . ह्या लेखाद्वारे आपण सक्सेशन सर्टिफिकिट संदर्भात थोडक्यात माहिती घेऊ . इंडियन सक्सेशन ऍक्ट १९२५ च्या कलम ३७२ अन्वये सक्सेशन सर्टिफिकेट मिळविण्यासाठी मयत व्यक्तीच्या वारसांना अर्ज करता येतो . त्या अर्जात मयत व्यक्तीचा मृत्यू दिनांक , मृत्यूसमयीचा राहण्याचा पत्ता , वारसांनि नवे आणि पत्ते आणि मयत व्यक्तीच्या मिळकतीचे वर्णन इ . गोष्टींचा उल्लेख अपेक्षित असते . हा अर्ज सक्षम जिल्हा न्यायालयात किंवा निर्देशित न्यायालयात करता येतो . पुण्यासारख्या ठिकाणी हा अधिकार दिवाणी न्यायालयांना दिलेला आहे . एक महत्वाचे म्हणजे ह्या अर्जातील कथने ही जाणूनबुजून खोटी केल्याचे आढळुन आल्यास तो आयपीसी प्रमाणे गुन्ह्याला मदत केल्याचा गुन्हा म्हणजेच अबेटमेंटचा गुन्हा धरला जाईल , अशीही तरतूद पुढे केली आहे . असा अर्ज केल्यावर कोर्ट इतर वारसांना नोटीसा काढते , तसेच ‘ सायटेशन ‘ नामक नोटीस देखील कोर्टाकडन प्रसिद्ध केली जाते आणि कोर्टाच्या आवारात किंवा मृत व्यक्तीच्या पत्त्याच्या जागी ती चिटकवली जाते तसेच वर्तमानपत्रामध्ये ‘ पब्लिक नोटीस ‘ देखील दिली जाते जेणेकरून कोणाला काही हरकत असल्यास
त्याची नोंद व्हावी . जर का कोणी हरकत घेतली , तर मात्र असा अर्ज हा एखाद्या दाव्याप्रमाणेच गुणदोषांवर चालतो . जर कुठलीही हरकत आली नाही तर कायद्याप्रमाणे पुरावे , कागदपत्रे इ . सिद्ध झाल्यावर कोर्ट ‘ सक्सेशन सर्टिफिकेट ‘ अर्जदाराच्या नावाने योग्य त्या अटी – शर्तीसह रुजू करते . कोर्टाला योग्य वाटल्यास अर्जदाराला योग्य ती सिक्युरिटी म्हणजेच जामीनदार किंवा बंधपत्र द्यायला सांगण्याचा अधिकारही कोर्टाला आहे . सर्टिफिकिटसाठी कोर्ट फी : इतर दावे दाखल करताना संपूर्ण कोर्ट फी हि दाव्याच्या व्हॅल्यूएशन प्रमाणे सुरुवातीलाच भरावी लागते . मात्र सक्सेशन सर्टिफिकेट बाबतीत कोर्ट फि सर्वात शेवटी म्हणजेच अंतिम ऑर्डर झाल्याच्या दिवशीच्या त्या मिळकतीच्या व्हॅल्यूवर आधारित असते . सध्या महाराष्ट्रपुरते बोलायचे झाल्यास जास्तीत जास्त रु . ७५ , ००० / – इतकी कोर्ट फी भरावी लागते . इतर कोर्ट प्रकरणांमध्ये जजमेंट , डिक्री , इतर हुकूम ह्यांची सही शिक्क्यांची प्रमाणित प्रत अर्जदाराला मिळते , मूळ प्रत कोर्टाकडेच राहते . मात्र सक्सेशन सर्टिफिकिट हे स्टॅम्पवर टाईप होऊन मुळ प्रत अर्जदाराला दिली जाते . सर्टिफिकिटचा उपयोग : सक्षम कोर्टाने दिलेले ‘ सक्सेशन सर्टिफिकिट ‘ हे सबंध भारतभर बंधनकारक असते आणि ते कोणीही नाकारू शकत नाही .

माहिती थोडक्यात देण्यात आली आहे. तरी काही शंका अथवा प्रश्न असल्यास संपर्क करू शकता.
संपर्क क्रमांक:- 9823165386
9860402161
9423886561

12/08/2021
02/08/2021

*Supreme Court in mumbai now*
Congratulations to Prime Minister Modi. The Central Government has decided to expand the branches of the *Supreme Court to three locations, Chennai, Mumbai and Calcutta,* for the first time since India's independence, with the Supreme Court operating only in the capital Delhi. Those who are dissatisfied with the High Court judgments in all the states of India will last seek the Supreme Court. Only those who could afford it went to Delhi and appealed. Many poor people were affected by not being able to go to Delhi and prosecute without knowing the procedure. The Madurai branch of the High Court has become a boon for those who are unable to come to Chennai and file a case as the Madurai branch of the High Court has already come to Tamil Nadu. Similarly, the Central Government has decided to expand the branches of the Supreme Court to three locations: Chennai, Mumbai and Calcutta. That too will be a boon for the people living in the southern states as the Supreme Court is coming to Chennai. The coming of the Supreme Court branch in Chennai is considered to be beneficial not only to the people of Tamil Nadu but also to the people living in other southern states like Andhra Pradesh, Telangana, Karnataka and Kerala.

29/07/2021

नवी दिल्ली : न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे होय असं म्हटलं जातं. त्यामुळे देशातील न्यायव्यवस्था तत्पर आण

'चेक बाऊन्स झाल्यास काय करावे  ? काय आहेत कायद्यातील तरतुदी? Cheque Bounce ( dishonored) ? -: पहिले   संबंधित व्यक्तीला ...
29/07/2021

'चेक बाऊन्स झाल्यास काय करावे ? काय आहेत कायद्यातील तरतुदी?

Cheque Bounce ( dishonored) ?

-: पहिले संबंधित व्यक्तीला कायदेशीर नोटिस पाठवावी जर ती व्यक्ती तरीही जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे आपल्या लक्षात आले तर अश्या वेळेस आपण 'The Negotiable lntruments Act 1881' section 138 नुसार न्यायालयात संबंधित व्यक्तीवर खटला दाखल करू शकता. अश्या स्वरूपाच्या गुन्ह्यात दोन वर्षा पर्यंत कारावास अथवा द्रव्य दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असते.

टिप: कायदयाचा वापर खरच त्रास असेल तर करा अथवा आपापसातही वाद समजुतीने मिटवले जाऊ शकतात. येथे थोडक्यात माहिती दिली आहे काही शंका/ प्रश्न असल्यास संपर्क करा. संपर्क क्रमांक 9823165386 /9860402161

:- First send the Legal Notice to the opposite party for the same, by any reason if you think that the opposite party willfully ignores you then you may file the Case u/s 138 of 'The Negotiable Instruments Act 1881', under which Court may award a Punishment upto 2 years or Fine or both to Opposite party.

Tip - Please do not misuse the legal provisions, If there is really serious issues then only go to Court, otherwise you may also settle the matter by mutual understanding,
This is short Information for any kind of questions confusion feel free to contact.

Address

Pune
411014

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Legal foresight law firm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share