20/08/2026
महाराष्ट्रात सुट्ट्या खाद्यतेलावर कडक कारवाई!
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र FDA ने खाद्यतेलाच्या विक्रीबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्रात सुट्टे किंवा उघडे खाद्यतेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तेलाच्या भेसळीचा धोका, असुरक्षित पॅकिंग, तेलाचा स्रोत व एक्सपायरीबाबत पारदर्शकतेचा अभाव यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आता ग्राहकांनी सीलबंद आणि योग्य लेबल असलेले खाद्यतेलच खरेदी करावे, असा FDA कडून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
दुकानदारांनीही विना-सील किंवा सीलशी छेडछाड केलेला तेलाचा साठा खरेदी किंवा विक्री करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते.
तुमच्या घरात वापरले जाणारे तेल सुरक्षित आहे का? हा निर्णय तुमच्यासाठी काय बदलणार?