तालुका विधी सेवा समिती,पनवेल

  • Home
  • India
  • Panvel
  • तालुका विधी सेवा समिती,पनवेल

तालुका विधी सेवा समिती,पनवेल तालुका विधी सेवा समिती,पनवेल

1. सर्व महिलांना मोफत वकील मिळवण्याचा अधिकार आहे. आवश्यक कागदपत्र आधार कार्ड.
2.

sc st कॅटेगिरीतील लोकांनी जातीचा दाखला आणि आधार कार्ड ही कागदपत्र दिल्यास त्यांना मोफत कायदेविषयक सहाय्य मिळेल.
3. इतर तीन लाख रुपये उत्पन्न

कामोठे येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्नकामोठे (प्रतिनिधी) – सुषमा पाटील महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कामोठे ये...
28/04/2026

कामोठे येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

कामोठे (प्रतिनिधी) – सुषमा पाटील महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कामोठे येथे आज तालुका विधी सेवा समिती, पनवेल तसेच पनवेल वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात पॅनल वकिलांमार्फत विद्यार्थ्यांना विविध महत्त्वपूर्ण कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये भारतीय संविधानाच्या भाग IV-A अंतर्गत मूलभूत कर्तव्ये, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, 2009, बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, 2012 (पॉक्सो कायदा), नालसा (मुलांसाठी बाल-स्नेही कायदेशीर सेवा) योजना, 2024 यांसह बालभिक्षा मागणे, बालमजुरी, बाल तस्करी व बालविवाह मुक्त भारत या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात ॲड. विकी दुसिंग, ॲड. नागेश हिरवे, ॲड. अमोल खिल्लारे तसेच PLV शैलेश कोंडसकर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वरिष्ठ लिपिक हेमंत आंबेतकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पनवेलकर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच मुख्याध्यापकांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

या कार्यक्रमास 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी असा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून, उपस्थित विद्यार्थ्यांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

19/03/2026
19/03/2026
तालुका विधी सेवा समिती,पनवेल आणि वकील संघटना,पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील न्यायालयात मोठ्या उत्साहात मराठ...
03/03/2026

तालुका विधी सेवा समिती,पनवेल आणि वकील संघटना,पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील न्यायालयात मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मराठी भाषेच न्यायालयीन कार्यक्षेत्रातलं महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने प्रमुख मान्यवर म्हणून सन्माननीय निवृत्त जिल्हा न्यायाधीश गाडगे मॅडम यांनी उपस्थित वकील वर्गाला आपल्या अनुभव संपन्न अशा वाणीतून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

पनवेल न्यायालय
Panvel

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तालुका विधी सेवा समिती,पनवेल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category