05/10/2020
ई पेन्शन सेवा डॉट कॉंम या वेब पोर्टल च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी सेवा निवृत्ती वेतन प्रस्ताव तयार करणे सुलभ व्हावे , या उद्देशाने ही अद्ययावत सेवा सुरु करताना आम्हाला अतीशय आनंद होत आहे. सदर पोर्टल हे या क्षेत्रातील ४० वर्षे इतका प्रदीर्घ अनुभव असलेले नंदुरबार येथील सेवा निवृत्त मुख्य लिपीप श्री नारायण माधव दिक्षीत यांच्या मार्ग दर्शनाखाली सुरु करीत आहोत. यात पेन्शन केस तयार नमस्कार करण्या संबंधी सर्व प्रकारच्या सेवा पुरविण्याचा आमचा उद्देश आहे. सेवा निवृत्त होणार्या कर्मचार्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा अवास्तव पैसा देखील खर्च करावा लागतो. योग्य मार्ग दर्शनाचा अभाव असतो. कागद पत्रे अपूर्ण असल्याने निवृत्ती वेतनाला विलंब होतो. अश्या सर्व अडचणींना मात देऊन आता या पोर्टल च्या सहाय्याने आपण आपल्या निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव आपण तयार करून घेऊ शकतात. त्या साठी मात्र आपणास सेवा शुल्क भरणे आवश्यक असेल.सदर शुल्क हे सेवे नुसार वेगवेगळे राहील. सुरुवातीला नियमित सेवा निवृत्ती वेतन प्रस्ताव, स्वेच्छा सेवानिवृत्तीवेतन प्रस्ताव, कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्ताव, भविष्य निर्वाह निधी चा प्रस्ताव , NOC चा प्रस्ताव , राजा रोखीकरण प्रस्ताव अश्या सेवा आम्ही सुरु करीत आहोत. त्या साठी आपण आपली माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. म्हणजे कागद पत्रे अचूक तयार होतील.असो यासोबत या वेब पोर्टल च्या माध्यमातून अश्या अनेक शैक्षणिक सेवा पुरविण्याचा आमचा मानस आहे. आपल्या अमुल्य सूचना संपर्क या पेज वर जाऊन आमच्या पर्यंत आपण पोहोचवू शकतात.