19/08/2026
*सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विषयांवर मंत्री बावनकुळे यांची कामगार नेते दिनेश बिल्लरवान यांनी घेतली भेट*
कामठी। अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन, कामठी शाखेचे अध्यक्ष तथा कामगार नेते दिनेश बिल्लरवान यांनी नगर परिषदेमधील सफाई कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतील विविध विषयांबाबत महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती विभागाचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी सेवानिवृत्त सफाई कामगारांचे प्रलंबित सेवानिवृत्ती लाभ, ग्रॅच्युइटी व इतर देयके तसेच पात्र सफाई कामगारांना श्रम साफल्य योजनेअंतर्गत पक्के घर मिळण्याबाबत बिल्लरवान यांनी मागणी मांडली. सफाई कामगारांच्या सामाजिक व आर्थिक समस्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेत संबंधित प्रश्नांवर आवश्यक ती सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप नागपूर ग्रामीण रामटेक जिल्हा मंत्री तथा अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे अध्यक्ष दिनेश बिल्लरवान, युनियनचे ज्येष्ठ मार्गदर्शक रूपलाल समुद्ररे, नरेश कलसे, महासचिव कृष्णा राणे, कोषाध्यक्ष शेखर वर्मन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.