23/10/2023
घटस्थापना : याच दिवशी स्त्रीने शेतीचा शोध लावला... म्हणुन तर माती चौरंगावर ठेवुन बीयाणे टाकुन कोणतं पिक जोमात येतं हे दहा दिवसात तपासलं जातं. चिंतन मंथन करा. शेतीचा शोध स्त्रीने लावला. म्हणून स्त्री बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण आहे.
घटस्थापना म्हणजे नेमके काय ?
आपल्या शेतातील माती आणायची व ती एका मातीच्या भांड्या कडेला ठेवायची. त्या मातीच्या भांड्यात आपल्या शेतात असणारे पाणी भरायचे. जेणेकरून तो ओलावा मातीमध्ये टिकून राहिला पाहिजे. जे बियाणे आपल्याला शेतात रब्बी हंगामात पेरायचे आहे त्या बियाणांचे विविध प्रकार असायचे व असतात. अश्या वेगवेगळ्या प्रकारची बियाणे त्या मातीत रूजवायची व नऊ दिवस निरीक्षण करायचे. ज्याची वाढ उत्तम असेल ते बियाणे आपल्या शेतात लावण्यासाठी अत्यंत योग्य आहे हे लक्षात यायचे. पुर्वी बियाणे तपासणी साठी लॅब नव्हत्या मग ही पद्धत त्यासाठी होती. याचा संबंध कोणत्याही धर्म व जातींशी नाही तर तो शेतकऱ्याशी आहे...!
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व
नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं : साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.
दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.
दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं : अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.
महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला).
नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.
नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.
नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.
‘नऊ’ प्रकारची दानं : अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.
नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार : श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.
प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.
समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).
मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश : अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.
मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.
मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू.
नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं : आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान.
अशा परम पावन मंगलमय नवरात्रीच्या सर्वांना ,मनापासून शुभेच्छा.
आई जगदंबेची अखंड कृपा आपल्या सग्गळ्यांवर आणि कुटुंबियांवर राहो
.... आणि....
सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
अशी "श्री जगदंबेच्या चरणी " प्रार्थना ......!!