11/06/2026
"घटस्फोट नको...पण संसारही नको!"
काही जोडपी अशी असतात की त्यांची अवस्था अगदी "तुझ्याशिवाय जगता येत नाही पण तुझ्यासोबत राहवतही नाही!"
एकमेकांना घटस्फोट द्यायचा नाही कारण अजून थोडाफार भावनिक "स्टॉक" शिल्लक असतो आणि एकत्र नांदायचंही नाही कारण रोजचा संसार म्हणजे आता "टिव्ही सीरियलचा नवा एपिसोड" वाटू लागलेला असतो!
अशा वेळी काय करायचं...?
काळजी नको...कायद्याने यासाठी एक भन्नाट मधला मार्ग दिलेला आहे "Judicial Separation!"
म्हणजे नेमके काय तर "तू तुझ्या घरी सुखी राहा...मी माझ्या घरी सुखी राहतो...!"
"एकमेकांच्या आयुष्यात हस्तक्षेप नाही पण वैवाहिक नात्याचा बोर्ड मात्र तसाच राहील!"
"घटस्फोट नाही पण संसाराचं सबस्क्रिप्शन तात्पुरतं बंद!" 😄
उदाहरणार्थ,
जोडीदाराचे बाहेर काही "विशेष मैत्रीपूर्ण संबंध" सुरू असतील,त्यामुळे त्याच्यासोबत राहणं कठीण झालंय... पण त्याला घटस्फोट देऊन पूर्ण मोकळंही करायचं नाही...
किंवा
संसाराचा गाडा रुळावरून घसरलाय...पण "Ex-Husband" किंवा "Ex-Wife" हा शिक्का नकोय...
तर मग...
"ना सोबत राहीन,ना तुला पुन्हा लग्नासाठी मोकळं करीन!" 😜
अशी भूमिका कायदेशीर भाषेत मांडायची असेल तर मा.न्यायालयात Judicial Separation चा अर्ज करता येतो.
थोडक्यात...
"Relationship Status : Married"
पण
"Live Location : वेगवेगळी!"
कायद्यानेही कधी कधी जोडप्यांना सांगितलेलं असतं...
"तुम्ही दोघं थोडं लांब राहा,कदाचित प्रेम परत सापडेल आणि नाहीच सापडलं तर पुढचा रस्ता तरी स्पष्ट होईल...!!!"