Adv Susmita Dound

Directions

Adv Susmita Dound Adv. Susmita Vikram Dound

Committed to Justice | Empowering Advocates
Voice for Reform | Lawyers for Change

कोणाचा द्वेष नाही कोणाचा मत्सर नाही ना कोणाची बरोबरी नाही, सर्वांना प्रेमाने बोलणारा, सरळ मार्गे चालणारा तू….. Happy Bir...
17/08/2026

कोणाचा द्वेष नाही कोणाचा मत्सर नाही ना कोणाची बरोबरी नाही, सर्वांना प्रेमाने बोलणारा, सरळ मार्गे चालणारा तू….. Happy Birthday dear Tathagat 🎂

14/08/2026

स्वातंत्र्य दिना निमित्त रिदांश च्या शाळेत प्रोग्राम ठेवला होता,त्यात आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या वेशभूषा त्याच्या क्लास मधील प्रत्येक मुलाना दिल्या होत्या आणी त्या राज्यासंदर्भात दोन शब्द बोलायचे होते… रिदांश ची पहिली वेळ होती स्टेज वर जाण्याची आणी बोलण्याची, एक आई म्हणून त्याच्या बद्धल उत्सुकता होती कसा बोलेल, बोलता येईल का व्यवस्थित, घाबरेल का ? पण माईक पर्यंत जाताना आत्मविश्वासाने टाकलेली पावले आणी बोललेल्या २ ओळी मनाला आनंद देऊन गेल्या… रिदांश ची पावले अशीच आत्मविश्वासाने वाढत जावोत आणी विविधतेने नटलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीत जात धर्म प्रांत सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन भारतीय ही स्वतंत्र ओळख जपण्याचा प्रयत्न करत राहो ह्या सदिच्छा…..

25/07/2026
20/07/2026

शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असताना देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागीतला जातो आणी यासाठी उपोषणाला बसावे लागते, आंदोलन करावे लागत आहेत तरी या सरकारला जाग येत नाही याउलट उपोषणकर्त्याला उचलून घेऊन गेले, आंदोलनकर्त्यांना लाठीचार्जे केला जात आहे त्यांच्या वर अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, आज लोकशाही मार्गाने आपला आवाज उठवण्यावर बंदी आणली जात आहे … एवढे सगळे होत असताना मात्र सरकार मागण्या करणाऱ्यांसोबत चर्चा करण्याऐवजी आवाज कसा दाबता येईल याचा पूर्णपणे बंदोबस्त करत आहे …….. विधार्थ्यांवर काठ्या लाठ्या उचलणे म्हणजे देश कुठल्या प्रगतीपथावर जात आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.

पप्पा आज तुमचा जन्मदिवस पण आज तुम्ही ह्या जगात नाहीत, वडील असणे आणी नसणे यातला फरक न मोजता येण्यासारखा असतो त्यातले त्या...
06/05/2026

पप्पा आज तुमचा जन्मदिवस पण आज तुम्ही ह्या जगात नाहीत, वडील असणे आणी नसणे यातला फरक न मोजता येण्यासारखा असतो त्यातले त्यात लेकीचे वडील म्हणजे पहाडासारखा खंबीर असतो तीच्या आयुष्यात, उन्हाळा आला आणी घराबाहेर पडत असले की तुमचे वाक्य नेहमी आठवते “ बाळा ऊन खूप आहे बाहेर जायचे असेल तर डोक्याला रुमाल बांधून जा “ ऊन थंडी पाऊस आपल्या लेकराला लागू नये म्हणून नेहमीच काळजी करणारे पप्पा खर तर ही काळजी फक्त ऋतू मधली नव्हती ती आयुष्यभराची होती
वडील नसले की त्यांच्या नसण्याच्या उणीवेच्या झळा मात्र आयुष्यभर लागतात…… Miss you so much Pappa

14/04/2026

महात्मा ज्योतीबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती…..

#शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा #

#

डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारांनी आत्मसात करूया….. ज्ञानाच्या प्रतीकाच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा
14/04/2026

डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारांनी आत्मसात करूया….. ज्ञानाच्या प्रतीकाच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा

काल डॉ बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांचे शासकीय वस्तीगृह किल्ले अर्क छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रपिता महात्मा फुले व महाम...
13/04/2026

काल डॉ बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांचे शासकीय वस्तीगृह किल्ले अर्क छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रपिता महात्मा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आयोजीत केली होती त्यासाठी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहिले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड डी एस बागुल सर, नगरसेवीका हर्षदा शिरसाट, भूमी व अभिलेख उपाधिक्षक अशोक भदर्गे सर,सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कराळे सर,उद्योजक बागुल सर, ॲड संदीप वाकळे व सार्थक भुईगळ उपस्थीत होते, विद्या बनसोडे यांच्या भारदार भीमगीताचा कार्यक्रम यावेळी झाला, माझे बंदू ॲड राघव हरबडे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने ४ दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजीत करून दोन्ही महापुरुषांची उत्साहात जयंती साजरी केली त्याबद्दल त्याचे अभिनंदन व शुभेच्छा

Address

601 Apex Parijat, Apex Corner , Gadiya Vihar
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Susmita Dound posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share