Adv.MutheMrunmayi

Adv.MutheMrunmayi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv.MutheMrunmayi, Mumbai.

03/03/2025

Career options after LLB

28/11/2024

बऱ्याच साठी पार केलेल्या लोकांना प्रश्न पडतो की आपण असतानाच आपल्या मुलांमध्ये एवढे मतभेद आहेत आपण गेल्यावर काय करतील? मालमत्ते वरून वाद तर होणार नाहीत ना...आणि आत्ताच जर मी ह्यांना मालमत्ता देऊन टाकली तर मला काही झाल्यावर हे मला सांभाळतील की नाही?अशी भीती वाटणं साहजिक आहे..आजकाल मालमत्ते साठी सख्खे भाऊ वैरी होतात..
मग ह्यावर उपाय काय?तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक मालमत्तेचे इच्छापत्र करू शकता. लोकं इच्छापत्र म्हणलं की घाबरतात.पण ती एक सोय असते जेणेकरून तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या मालमत्तेवरून तुमच्या वारसांमध्ये भांडण होणार नाहीत.
आता इच्छापत्र म्हणजे नक्की काय?ते कसं लिहायचं आणि त्यासाठी काय कागदपत्र लागतात?ते आपण बघुया..
•इच्छापत्र/मृत्युपत्र म्हणजे काय?
इच्छापत्र म्हणजे व्यक्तीच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे त्याच्या मृत्यूनंतर व्यवस्थापन करणारा दस्तऐवज....इच्छापत्र म्हणजे अशी सोय जी व्यक्ती जिवंत असताना केल्यामुळे मृत्यूनंतर तिच्या वारसांमध्ये तिच्या property वरून भांडण होणे टाळते.
इच्छापत्र तुम्ही साध्या कागदावर पण करू शकता.इच्छापत्र कितीही वेळा बदलता येते.त्यातले सगळ्यात शेवटचे इच्छापत्र ग्राह्य धरले जाते.आता ह्यामध्ये देखील थोडा वाद आहे.एकाधिक मालमत्तांकरिता वेगळे इच्छापत्र करता येते .पण मग त्यातील आधी केलेले इच्छापत्र वेगळ्या मलमत्तांसाठी असेल तर ते रद्द होत नाही.जरी शेवटचे इच्छापत्र ग्राह्य धरले जात असले तरी आधीचे इच्छापत्रातील मालमत्ता वेगळी असेल तर ते देखील ग्राह्य धरले जाते.
ह्यामध्ये मूळ इच्छापत्रात बदल करणारा मसुदा तयार केला तर त्याला ' इच्छापत्राची पुरवणी ' म्हणतात.

•इच्छापत्र कोण बनवू शकते?
कायदेशीरदृष्ट्या सज्ञान (वयाची 18 वर्ष पूर्ण असलेली) असलेली व्यक्ती व मानसिक दृष्ट्या स्थिर असलेली कोणतीही व्यक्ती मृत्युपत्र बनवू शकते.
अशी व्यक्ती फक्त स्वतःच्या इच्छेने इच्छापत्र बनवू शकते.कोणाच्या दबावाने किंवा प्रभावाखाली येऊन केलेले इच्छापत्र वैध मानले जात नाही(अर्थात मृत्यूनंतर ते सिद्ध करणे फारच अवघड असते).
मूक,अंध किंवा बहिर्या व्यक्ती सुद्धा इच्छापत्र बनवू शकतात परंतु अशा परिस्थितीत त्यांच्याजवळ त्यांच्या कार्याचे कायदेशीर परिणाम समजून घेण्यासाठी लागणारी सक्षमता असणे आवश्यक आहे.

इच्छापत्र कसे करावे?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.. इच्छापत्राचे कोणतेही ठराविक स्वरूप (format) नसते.तुम्ही साध्या कागदावर साध्या शब्दात सुद्धा इच्छापत्र लिहू शकता.त्यामुळे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही वकिलाची मदत घेतलीच पाहिजे असं काही नाही.पण पुढे जाऊन काही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी तुम्ही वकिलाची मदत घेऊ शकता.
इच्छापत्र तयार करताना सगळ्यात आधी तुमच्याकडे असेलल्या सर्व मालमत्तेची कागदपत्रे गोळा करा.प्रत्यक्ष इच्छापत्रात ह्या कागदपत्रांची काही आवश्यकता नसली तरी लिहिताना वर्णन अचूक यावे यासाठी तुमच्याजवळ सगळी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
इच्छापत्र लिहताना त्यात तुमच्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील नीटपणे लिहीलेला हवा.इच्छापत्र लिहिताना जरी कोणत्याही format ची गरज नसली तरी त्यात वापरलेली भाषा ही समोरच्याला समजेल अशी सहज, सोपी आणि नेटकी असावी.
आपल्या मालमत्तेचे वर्णन नीटपणे केलेले असावे जेणेकरून नंतर नक्की कोणत्या मालमत्तेचे वर्णन आहे असा प्रश्न संभवणार नाही. समजा , चांदी सोन्याचे दागिने असतील तर त्याचा देखील तपशील म्हणजे त्याचं वजन आणि डिझाईन कशी आहे त्यातला कोणता दागिना कोणत्या व्यक्तीला दिला आहे ह्याचे वर्णन नीटपणे करणे आवश्यक आहे.
इच्छापत्रात मृत्यूनंतर जर तुम्हाला व्यवस्थापक (executor) नेमायचा असेल तर तुमच्या इच्छापत्राची व्यवस्था लावणाऱ्या व्यक्तीचे म्हणजेच व्यवस्थापकाचे नाव,वय,पत्ता आणि तुमच्याशी असलेलं नातं लिहणे आवश्यक असते .

•इच्छापत्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
इच्छापत्र तयार करताना तुम्हाला कोणतेही कागदपत्र जोडण्याची गरज नसते .फक्त इच्छापत्र लिहणारी व्यक्ती मानसिक दृष्ट्या स्थिर आहे हे दर्शविणारे डॉक्टर चे प्रमाणपत्र लागते.
इच्छापत्र तयार झाल्यानंतर त्यावर इच्छापत्र करणाऱ्याची सही किंवा शिक्का आणि दोन साक्षीदारांची सही ...बस......
इच्छापत्र कायदेशीर ठरण्यासाठी त्यावर दोन सज्ञान साक्षीदारांनी सही करणे कायद्याने आवश्यकआहे. इच्छापत्र करणाऱ्याने आणि दोन साक्षीदारांनी एकमेकांसमोर इच्छापत्रावर सही करणे गरजेचे आहे.
टीप: इच्छापत्रातील लाभार्थींना साक्षीदार म्हणून सही करता येत नाही आणि साक्षीदारांना इच्छापत्रातील तपशील माहीत असणे गरजेचे नाही.

•वडिलोपार्जित संपत्तीचे इच्छापत्र करता येते का?
स्पष्ट नाही.......
तुम्ही फक्त तुमच्या वय्यक्तिक मालमत्तेचे व्यवस्थापन इच्छपत्राद्वारे करू शकता.
जर तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन झाले असेल तर त्यातली विभाजन होऊन तुमच्या हिश्श्याला आलेली मालमत्ता ही स्वकष्टार्जित म्हणून ओळखली जाते.त्यामुळे त्या मालमत्तेचे व्यवस्थापन तुम्ही इच्छापत्राने करू शकता.

•इच्छापत्राची नोंदणी आवश्यक आहे का?
इच्छपत्राची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही .तुम्ही साध्या कागदावर लिहलेले मृत्युपत्र देखील ग्राह्य धरले जाते.ते केल्यानंतर त्याची नोंदणी केलीच पाहिजे असे बंधन नाही.नोंदणी न केलेले इच्छापत्र कायदेशीर मानले जाते.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असे मानले आहे की नोंदणीकृत नसलेली इच्छापत्र वैध आणि कायद्याने लागू करण्यायोग्य आहेत . परंतु, नोंदणी न केलेल्या इच्छपत्राना न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे निबंधक कार्यालयात तुमचे इच्छापत्र नोंदणीकृत करून घेणे केव्हाही चांगले.
इच्छा पत्राची नोंदणी करण्यासाठी कोणतीही मुदत नसते.तयार केल्यानंतर लगेचच नोंद केली पाहिजे असे आवश्यक नाही.तुम्ही इच्छापत्र तयार केल्यानंतर कितीही दिवसांनी त्याची नोंदणी करू शकता.
इच्छापत्रासाठी कोणतीही स्टॅम्प ड्युटी लागत नाही .त्यामुळे खरेदीखत किंवा बक्षीस पत्राच्या तुलनेत इच्छा पत्राने केलेल्या हस्तांतरणाला खर्च कमी येतो. इच्चापत्राची नोंद करताना फक्त नोंदणीचा खर्च लागतो.

•इच्छापत्र कधी करावे?
आपल्याकडची लोकं असं म्हणतात की धडधाकट माणसं कुठे मृत्युपत्र करतात का....आपलं वय झाल्यानंतर मृत्युपत्र केलं पाहिजे ..जेव्हा मृत्यू जवळ आला असं वाटतं तेव्हा मृत्युपत्र केलं पाहिजे ....लवकर केलं तर लवकर मृत्यू येतो वगैरे...
पण मृत्यू कधी सांगून येत नाही.वय झाल्यावरच मृत्यू होईल असं सांगता येत नाही.त्यामुळे मन स्थिर असताना आणि आरोग्य उत्तम असताना मृत्युपत्र करणे योग्य.

•इच्छापत्राची अंमलबजावणी कधी करता येते?
अर्थातच इच्छापत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर..इच्छापत्र हे करणाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणारे दस्तऐवज आहे त्यामुळे त्याची अंमबजावणी ही करणाऱ्याच्या मृत्यूनंतरच करता येते.
हस्तंतरणाचे इतर देखील पर्याय आहेत.जसे की खरेदीखत , बक्षीसपत्र ..परंतु एकदा केलेले बक्षिसपत्र किंवा खरेदीखत तुम्हाला रद्द करता येत नाही.आणि इच्छपत्राचा एक सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमच्या मालमत्तेचा तुम्ही तुमच्या मृत्यूपर्यंत उपभोग घेऊ शकता.तुमच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर तुम्ही जिवंत असेपर्यंत कोणीही हक्क सांगू शकत नाही.शेवटी निर्णय तुमचाच......

24/10/2024

Ladies....तुमची property कोणाला मिळणार??

आजकाल बहुत करून महिला नोकरदार आहेत.काहींनी कष्ट करून बिझनेस उभारला आहे.मग अशी कष्ट करून मिळवलेली property तुमच्या मृत्यू नंतर कोणाला मिळणार ते आज आपण बघुया.
हिंदू उत्तराधिकार कायदा ,1956 च्या कलम 15 मध्ये आपल्याला हिंदू महिलांच्या मृत्यू नंतर तिचे वारस कोण असतील ह्याची माहिती मिळते.
• आता कलम 15 काय म्हणत?
हिंदू महिला जर तिच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे will न करता मरण पावली(when she dies intestate) तर तिची मालमत्ता तिच्या मृत्यू नंतर खालील क्रमाने devolve करण्यात येते.
1. प्रथमत: तिचा मुलगा ,मुलगी (तिच्या मृत्यू पूर्वी मरण पावलेल्या मुलांचे मुलगा /मुलगी चा देखील ह्यात समावेश होतो) आणि पती;
2. पतीचे वारस
3.महिलेचे आई- वडील
4. वडिलांचे वारस
5. आईचे वारस

• आता वरील क्रम कसा वाचतात?
वर दिलेल्या सगळ्यांना महिलेची मालमत्ता मिळते का?
तर नाही....
प्रथम क्रमांकावर असलेले वारस असतील तर फक्त त्यांच्यामध्येच महिलेच्या property चे devolution करण्यात येते.
ते नसतील तर दुसऱ्या क्रमांकाच्या वारसांना प्राधान्य मिळते . दुसऱ्या क्रमांकाचे वारस देखील नसतील तर तिसऱ्या क्रमांकावरील वारसांना and so on......

ह्यात पण थोडंसं अजून पुढे वेगळं वळण आहे..
ते म्हणजे ...
- जर महिलेला मूलबाळ नसेल(ह्यात महिलेच्या आधी मरण पावलेल्या मुलांच्या मुलगा /मुलगी चा देखील समावेश होतो) आणि जर महिलेची मालमत्ता ही तिला तिच्या आई किंवा वडिलांकडून मिळालेली असेल तर अशी मालमत्ता ही महिलेच्या मृत्यूनंतर बाकी कोणाला न मिळता तिच्या वडिलांच्या वारसांना मिळते.
त्याचप्रकारे....
-जर महिलेला मूलबाळ नसेल(ह्यात महिलेच्या आधी मरण पावलेल्या मुलांच्या मुलगा /मुलगी चा देखील समावेश होतो) आणि जर महिलेची मालमत्ता ही तिला तिच्या पती किंवा सासऱ्यांकडून मिळालेली असेल तर अशी मालमत्ता ही महिलेच्या मृत्यूनंतर बाकी कोणाला न मिळता तिच्या पतीच्या वारसांना मिळते.

आता बघा आपल्या मृत्यू नंतर आपली मालमत्ता कोणाला मिळणार हे आपल्या हातात नाही...ते सगळं कायदा ठरवतो..त्यामुळे तुमची property तुम्हाला तुमच्या पद्धतीने द्यायची असेल तर एकच मार्ग आहे ते म्हणजे मृत्युपत्र.

आपला आपल्या मुलांवर कितीही विश्वास असला तरी property चा विषय आला की भाऊ भावाचा वैरी होतो...
मी काही घाबरवत नाहीये..पण property चे वाद संपत नाहीत.त्यापेक्षा आपल्या मालमत्तेची वाटणी आपण आपल्या पद्धतीने करणं म्हणजेच समजूतदारपणा...

Will करावे का gift deed ?
मी म्हणेन मृत्युपत्र केव्हाही चांगले.कारण मृत्युपत्र तुम्हाला केव्हाही बदलता येते .तुमच्या मृत्यूपर्यंत कितीही वेळा तुम्ही त्यात बदल करू शकता .मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या तारखेचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मृत्यूपर्यंत तुमची मालमत्ता तुमचीच राहते.

(हा लेख फक्त आणि फक्त महिलेच्या स्वकष्टार्जित (self acquired) मालमत्तेचे devolution ची माहिती देतो.)

- ऍड.मृण्मयी मुठे

Beware!!आचारसंहिता लागू झाली आहे..   #महाराष्ट्र    #विधानसभा  #निवडणूक
19/10/2024

Beware!!आचारसंहिता लागू झाली आहे..
#महाराष्ट्र #विधानसभा #निवडणूक

10/04/2024

नवरा: अगं..ऐकतेस का??investment म्हणुन एक घर घ्यावं म्हणतोय छोट..तसे savings झालेत..प्लॅन तर आधीपासूनच होता...आता थोडे जमलेत तर घ्यावं म्हणतोय.

बायको: अरे व्वा... चांगलं आहे की मग... कुठे घ्यायचं?

नवरा: तूच ठरव आता...कारण तुझ्याच नावाने घ्यायचं आहे..

बायको:काय थट्टा करता काय? माझ्या नावाने कशाला?मी काय करणार त्याचं??

नवरा:थट्टा काय त्यात??घरातलीच आहेस ...तुझ्याच नावाने घ्यायचं ...

बायको:अहो पण कशाला??त्याने काय फायदा होणारे असा मोठा??

नवरा: अगं बाई....भरपूर फायदे मिळतात....थांब सांगतो...
1.Stamp Duty concession:
आजकाल property खरेदी वर रग्गड stamp duty भरावी लागते.
पण बऱ्याच राज्यांमध्ये प्रॉपर्टी घेणारी व्यक्ती महिला असेल किंवा joint property म्हणुन घेतली आणि त्यात एक महिला असेल , तर त्यावर स्टॅम्प ड्युटी मध्ये concession मिळतं.त्यामुळे खूप पैसे वाचू शकतात.

2.tax Exemptions :
महिलांना घर खरेदीवर टॅक्समध्येही सूट मिळते. विविध शहर नगरपालिका प्रॉपर्टी खरेदीवर महिलांना करात सूट देतात, परिणामी गेल्या काही वर्षात महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदीचा ट्रेंड लक्षणीय वाढला आहे.

3.Lower interest rates:
जर घर तुझ्या नावावर घेतलं....तर loan पण तुझ्या नावावर घेणार...आणि तुम्हा बायकांना बँकेत home loan मध्ये सुद्धा इंटरेस्ट rate कमी आहे....

बायको: अच्छा....म्हणजे तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत म्हणून हा खटाटोप का.....मला वाटलं......

नवरा: वाटलच मला...तुला असंच वाटेल....पूर्ण ऐकून घे....
जर घर तुझ्या मालकीचं असेल तर तू economically secured असशील आणि त्यावर तुझा पूर्ण अधिकार असल्यामुळे तू पूर्ण स्वातंत्र्याने कोणताही निर्णय घेऊ शकतेस. मग मी, मुलं किंवा कुटुंबातील इतर कोणी सहमत असोत की नसोत.

बायको: व्वा!चांगली कल्पना आहे....आपले पैसे पण वाचतील आणि माझ्या नावाने घर पण होईल....हुशार आहे माझा नवरा बुवा....

07/03/2024

महिलांचा सन्मान करूया....आपल्याच घरापासून सुरुवात करुया....

28/02/2024

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv.MutheMrunmayi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share