मी भिमाची लेखनी

मी भिमाची लेखनी Adv Snehal SanjanaVilas NikaleJadhav
Advocate High Court Mumbai

समाज घडवण्यासाठी समाज शिकला पाहीजे..

समाजासाठी, समाजात होणारे अन्याय-अत्याचारां विरुध्द आवाज उठवण्यासाठी, कायदेशीर लढा देण्यासाठी, समाजाला शिक्षण, कायदा, सामाजिक ज्ञान, मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर..

Happiest Birthday My Dear Dad❤️💐🥳🙌🏻🥂 Live Long Be Happy Always❤️
15/05/2025

Happiest Birthday My Dear Dad❤️💐🥳🙌🏻🥂 Live Long Be Happy Always❤️

बुद्धं नमामि🙏🏻धम्मं नमामि🙏🏻संघं नमामि🙏🏻
12/05/2025

बुद्धं नमामि🙏🏻
धम्मं नमामि🙏🏻
संघं नमामि🙏🏻

बुद्धं नमामी 🙏🏻बुद्ध पौर्णिमा 🙏🏻❤️
12/05/2025

बुद्धं नमामी 🙏🏻

बुद्ध पौर्णिमा 🙏🏻❤️

मातृदिन विशेषआई आपल्या लेकराला भूक लागल्या नंतर तो रडायच्या आधी त्याला खाऊ का घालते..तो रडल्यावर, तो पडल्यावर धडपडल्यावर...
11/05/2025

मातृदिन विशेष

आई आपल्या लेकराला भूक लागल्या नंतर तो रडायच्या आधी त्याला खाऊ का घालते..

तो रडल्यावर, तो पडल्यावर धडपडल्यावर आईच्या डोळ्यात आपसूकच पाणी का येत..

तो आजारी झाला तर आईचा जीव कासावीस का होतो..

त्याला कोणी इतर जवळ घेत असेल आणि माया लावत असेल तर आपलं मूल आपल्यापासून लांब तर जाणार नाही ना या भावनेने मनात भीतीने काहूर का माजतो..

आपल्या मुलांच आयुष्य त्यांच भविष्य सुरक्षित करण्यासाठी आई सतत विचारात का असते..

आई आपल्या मुलांसाठी अख्ख्या जगाशी भांडायला तयार का असते..

हे मला आई झाल्यानंतर समजलं..

हा आजचा मातृदिन माझ्या अश्वत्थ मुळे मी एक आई म्हणून साजरा करत्ये

थँक्यू अश्वत्थ या मातृत्वासाठी..❤️

माझा पहिला मातृदिन🥰❤️😇🙌🏻🧿

✒️
👩🏻‍⚖️ॲड. स्नेहल निकाळे-जाधव
वकील उच्च न्यायालय मुंबई.

बा भीमा,तुमची जयंती साजरी करणं, तुमच्या उपकारांची परतफेड म्हणून नाही, ही परतफेड आम्हालाच काय, आमच्या पिढ्यांनाही जमणार न...
14/04/2025

बा भीमा,

तुमची जयंती साजरी करणं, तुमच्या उपकारांची परतफेड म्हणून नाही, ही परतफेड आम्हालाच काय, आमच्या पिढ्यांनाही जमणार नाही, हा थाट, हा आनंद अभिमान आहे तुमच्या कर्तृत्वाचा तुम्ही आमच्या साठी केलेल्या प्रत्येक संघर्षाचा, बा भिमा... ही रोषणाई कौतुक सोहळा आहे तुम्ही आमच्यावर केलेल्या निःस्वार्थ प्रेमाचा !!

थँक्यू बाबासाहेब..❤️🙏🏻

👩🏻‍⚖️ॲड. स्नेहल निकाळे-जाधव
वकील उच्च न्यायालय मुंबई.

3 Years Down❣️Cheers🥂  🙌🏻😇❣️❤️
13/04/2025

3 Years Down❣️Cheers🥂
🙌🏻😇❣️❤️

माळी समाजाचा एक माणूस आख्या शूद्रांचा उद्धार करायला निघाला.. पण भटांना ते अपचनी पडले.. त्यात त्यांनी त्यांच्या बायकोला श...
11/04/2025

माळी समाजाचा एक माणूस आख्या शूद्रांचा उद्धार करायला निघाला.. पण भटांना ते अपचनी पडले.. त्यात त्यांनी त्यांच्या बायकोला शिकवून इतर स्त्रियांना शिकवण्याचे ठाम केले, स्त्रिया शिकणार म्हणजे मग तर स्त्रिया यांच्या चालीरीतींना लाथ मारणार..

हे कस काय भटांना सहन होईल.. मग त्यांनी फुले दाम्पत्यांना त्रास द्यायला सुरुवात केली..

आणि या त्रासाने क्रांती घडवून आणली..

आणि स्त्रिया शिकल्या वैचारिक लढा सुरू झाला आणि जुनाट चालीरीती मोडकळीस येऊ लागल्या..

सर्व श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहे..

आणि म्हणून ते महात्मा ठरतात..

अशा महात्म्यास त्रिवार अभिवादन..🙌🏻🙏🏻❣️💐

👩🏻‍⚖️ॲड. स्नेहल निकाळे-जाधव
वकील उच्च न्यायालय मुंबई.

आसवांनी भरलेला मायेचा मुजरा..🙏🏻💐 #महाराज🙏🏻💐
03/04/2025

आसवांनी भरलेला मायेचा मुजरा..🙏🏻💐

#महाराज🙏🏻💐

05/12/2024

बा भीमा आमच्या सावलीचा ही विटाळ व्हायचा..
आमच्या पावलाचे ठसे सुद्धा नको असायचे..
आम्हाला कधी काही कपडे घ्यावेसे वाटले तर आम्हाला फाडून चिखलात लोळवून कपडे दिले जायचे..
पाण्यासाठी तडफड व्हायची..
तुम्ही आलात, तुम्ही आलात आणि आमच्या आयुष्यातला अंधार दूर झाला..
तुम्ही स्वतःचा, स्वतः च्या कुटुंबाचा, बायको मुलांचा विचार करू शकले असता..
तुम्ही एखाद्या राजकारणी माणसासारख स्वतः च्या स्वार्थाचा विचार करू शकले असता..
पण तुम्ही सूर्यासारखे होतात स्वतःला जाळत इतरांना प्रकाश देत राहिलात निःस्वार्थीपणे..
जन्मदाते आई वडील आपल्याला दिलेल्या जन्मास कितीवेळा बोलून दाखवतात..
पण तुम्ही काहीच नाही मागितले.. उलट भरभरून करत राहिलात..
समाजात प्रत्येकाला त्या प्रत्येकाच्या येणार्‍या पिढीला मानाचे स्थान, समानता मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटत राहिलात..
तुम्ही आमच्या आयुष्यात सुर्य होऊन आलात.. आणि प्रकाशित करून टाकले सार्‍यांचे आयुष्य..
आमच्या मातीमोल असलेल्या आयुष्याला सोने करणार्‍या सोनारास त्रिवार अभिवादन..🙏🏻💐

असा होणार नाही कोणी
असा झालाच कोणी..
दिनांचा धनी रं..
💐🙏🏻

बाबासाहेब जिंदाबाद..🙏🏻❤️

ॲड स्नेहल निकाळे-जाधव
वकील, उच्च न्यायालय मुंबई.

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त...
26/06/2024

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏💐

मंगेश पाडगावकर यांनी या कवितेत जी वाक्यरचना केलीये.. अगदी हुबेहुब चायवाला रेखाटला आहे असे जाणवतयं..
09/05/2024

मंगेश पाडगावकर यांनी या कवितेत जी वाक्यरचना केलीये.. अगदी हुबेहुब चायवाला रेखाटला आहे असे जाणवतयं..

Address

Mumbai

Telephone

+918828677102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मी भिमाची लेखनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मी भिमाची लेखनी:

Share