Pralhad Bhise Patil

Pralhad Bhise Patil journalist

29/01/2026

दादा जातीचा होता म्हणून नव्हे;तर सामान्य जनतेच्या मदतीचा पुढाकार म्हणून खंत वाटते. असा नेता या कलयुगात होणे नाही. नाहीतर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणारे राजकारणी पावलो पावली दिसून येतात.

१४ जानेवारी – मराठा शौर्य दिवस 🚩🚩 मराठा शौर्य दिवसाला मानाचा मुजरा 🚩१४ जानेवारी १७६१ रोजीपानिपत येथे मराठा साम्राज्याचे ...
14/01/2026

१४ जानेवारी – मराठा शौर्य दिवस 🚩
🚩 मराठा शौर्य दिवसाला मानाचा मुजरा 🚩

१४ जानेवारी १७६१ रोजी
पानिपत येथे मराठा साम्राज्याचे युद्ध
अहमदशहा अब्दालीविरुद्ध झाले.

या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला,
पण मराठ्यांचे शौर्य, धैर्य आणि स्वाभिमान कधीच संपले नाहीत.

#पानिपत हा शेवट नव्हता,
तो होता पुन्हा उभे राहण्याचा #संघर्ष.

#पराभव पचवून,
थोड्याच काळात मराठ्यांनी
दिल्लीवर पुन्हा आपला #झेंडा फडकवला.

👉 म्हणूनच
१४ जानेवारी = पराभव नव्हे, मराठा शौर्याची आठवण
#मराठा #शौर्य #दिवस

जय जिजाऊ
11/01/2026

जय जिजाऊ

09/01/2026
*समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलला आग; ३६ प्रवासी सुखरूप – मोठा अनर्थ टळला*मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर म...
06/01/2026

*समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलला आग; ३६ प्रवासी सुखरूप – मोठा अनर्थ टळला*
मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाच वेळीच सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३००.१ येथे नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल वाहनाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, मलकापूर पोलीस केंद्र अंतर्गत समृद्धी महामार्ग उपकेंद्र दुसरबीड येथे रात्रगस्त पेट्रोलिंग सुरू असताना CRO संभाजीनगर यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली की चॅनल क्रमांक ३००.१ (मुंबई कॉरिडोर) येथे एका ट्रॅव्हलला आग लागलेली आहे. ही माहिती मिळताच API संदीप इंगळे, HC ९९८, HC १२१४, PC १९१४, PC ५२३ तसेच एम.एस.एफ.चे दोन जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रॅव्हल क्रमांक MH 40 CT 8043 (खुराणा ट्रॅव्हल) ही रस्त्याच्या कडेला जळत असल्याचे दिसून आले. सदर ट्रॅव्हलचे चालक वाहिद शेख (वय ३६, रा. नागपूर) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ट्रॅव्हलच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. सदर ट्रॅव्हल नागपूर येथून नाशिककडे जात होती. वाहनामध्ये एकूण ३६ प्रवासी प्रवास करत होते.
आग लागल्याची बाब लक्षात येताच चालक व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तात्काळ सुरक्षितरित्या बाहेर काढले. कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
अपघातानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना सरकारी वाहन MH 28 C 6367 द्वारे दुसरबीड टोलनाक्यावर सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. अपघातग्रस्त ट्रॅव्हल रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती.
ही घटना मेहकरजवळील शिवणी पिसा गावालगत समृद्धी महामार्गावर घडली असून, वेळेवर मदतकार्य व पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

01/01/2026

नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा‼️

नवे स्वप्न, नवी उमेद आणि नवी दिशा घेऊन येणारे हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य, समृद्धी व यश घेऊन येवो.
आपल्या सर्वांच्या अपेक्षा व आकांक्षा पूर्ण होवोत, हीच सदिच्छा.

प्रल्हाद भिसे पाटील
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान मेहकर संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार

#नववर्षाभिनंदन #नववर्ष२०२६ #शुभेच्छा #नवीनसंकल्प

*मतदार व उमेदवारातील नैतिकता;नेत्यांची घराणेशाही**गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकारखडल्...
28/12/2025

*मतदार व उमेदवारातील नैतिकता;नेत्यांची घराणेशाही*

*गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकारखडल्या गेल्या होत्या, मात्र मा. न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वप्रथम नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडल्या, मात्र अनेक ठिकाणी आरक्षणाचे वाद व उमेदवाराची छाननी, सदस्य अपात्रतिशी संबंधित न्यायालयीन याचिका प्रलंबित होत्या, त्यामुळे या प्रकरणातील काही मतदारसंघातील निवडणुका २० डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आल्या; त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सर्व टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यावरच निकाल जाहीर करणे आवश्यक असल्यामुळे दोन्ही टप्प्यांची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला पार पडली, मात्र यावेळी मतदारांची व उमेदवारांची अनैतिकता जगासमोर आली तर घराणेशाहिच्या मर्यदेचा बांध फुटला, नागरिकांनी आपली चन-चन मोठ्या प्रमाणावर दूर करून घेतली तर उमेदवारांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर पूर्ण करून दिली. यामुळेच देणारे व घेणाऱ्यांच्या अनैतिकतेने लोकशाहीच्या तत्वांची पायमल्ली झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.*

*निवडणुकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीत चालणारी म्हणणाऱ्यांना चपरा, देवाणघेवाण आता उच्च,शिक्षित, प्रतिष्ठेची अंमलबजावणी करण्याच्या ( काही सोडलेतर ) घराघरा पर्यंत पोहचली तर झोपडपट्टी फक्त बदनाम आहे? खरतर गेल्या तीन-चार वर्षांपासून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत,जिल्हापरिषद, पंचायत समित्यावर प्रशासक कार्यरत आहे, मात्र या काळात नागरिकांच्या प्रत्यक कामे झाली, तर विकास थांबला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना सत्तेचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर लोकशाही आणणे, जनतेच्या गरजा " शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते " पूर्ण करणे स्थानिक भागात विकासाची गंगा आणून लोकशाहीत जगण्यासाठी स्थानिक पातळीवर स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी एक माध्यम आहे, मात्र आता या निवडणुकीत परिस्थिती हळू हळु बदलून या नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत युवकांची फळी धाब्यावर नंगा नाच, तर गल्लीबोळ्यात मद्यपेय व देवाण-घेवाण आचारसहितेत लोकशाही धिंडवडे उडवत, तर मतदानदिनी सुद्धा मतदान केंद्राच्या बाजूला देवाण-घेवानीचे अड्डे लोकशाहीला जिवंतपणी मरण यातना देत होते.*

*यासर्व घडामोडीत घराणेशाहीच पूर्वीपासून भारतीय

Address

Mehkar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pralhad Bhise Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pralhad Bhise Patil:

Shortcuts

Share