कामगार कायदे ,समस्या व मार्गदर्शन

  • Home
  • India
  • Akola
  • कामगार कायदे ,समस्या व मार्गदर्शन

कामगार कायदे ,समस्या व मार्गदर्शन we are a labour organisation Devoted to the welfare and Rights using Labour Laws.

We represent the Labour at Assistant commissioner of Labour office and connected all Labour court and Labour Law Fourm

ओबीसी... नही समझेगे...
12/07/2022

ओबीसी... नही समझेगे...

21/06/2022

“PM Modi के "मित्रों" ने देश की जनता का ₹ 10.5 Lakh Crore लूट लिया और केवल ₹ 32,000 करोड़ के लिए आप भारत माँ की सुरक्षा के साथ गद्दारी कर .....

21/06/2022

👉कविता मज भावली म्हणून आपणास पाढवतो, बघा जमलच तर पुढे पाढवा
•••••••••••••••••••••••••
👉संविधान 👈
गिता बायबल कुराणाचा
रात्री कोर्टात रंगला वाद |
टेबलावरच्या संविधानकडे
जो तो मागत होता दाद ||
बायबल म्हणाले मी मोठा
माझा जगात वाजे डंका |
पण धर्मांतराची यादी वाचून |
आली संविधानाला शंका ||
गिता म्हणाली माझा निर्माता
साक्षात आहे भगवान कृष्ण |
पण साक्षिदार हजर नव्हता
तेंव्हा उभा राहिला मोठा प्रश्न ||
मै बडा मै बडा असं म्हणत
कुरानाने मांडली स्वतःची बाजू
पण उलट तपासणी होताच |
न्यायाचा हलू लागला तराजू ||
दंगलीची फाईल उघडताच |
कुरानाला फुटला घाम |
गिता आपल्या मना मध्ये |
आठवू लागली राम राम ||
अनुयायांचा विषय निघताच |
सारी मोडू लागली बोटं |
म्हणाले आमच्यावर हात ठेऊनी |
ते खुशाल बोलतात खोटं ||
सविधानाने सर्व बाजू ऐकून
विचार केला बारीक |
पुढील ठोस निर्णयासाठी |
त्यांना दिली पूढची तारिख ||
शेवटी भांडणात धर्मग्रंथांच्या |
बघता बघता पहाट झाली |
आली सर्व धर्माची मानसे |
न्याय मागायला कोर्टात आली
न्यायधीश बसले खुर्चीवर
आणी सुरू झाले खटले |
पण आपल्यापेक्षा संविधान मोठे |
हे सर्व धर्मांना पटले ||
हे सर्व धर्मांना पटले ||
••••••••••••••••••••••••••••कविता कुणाची आहे हे ठाऊक नाही पण रचना व त्यातील आशय आणि मांडणी ही मनाला भावली •••••••••••
⭐संग्राहक ⭐
प्रिं, संजय रोकडे मुलूंड मुंबई

19/06/2022

*धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही...*

*- पु.ल.देशपांडे*

एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात.

समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्या ऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता.

मला कुठल्याही संतापेक्षा अनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.

विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील.

मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील.

धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.

पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.

नेत्यांना विष्णू, बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.

त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही.

अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही.

‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ.
त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ.

सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.

कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे.

पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे.

माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली, पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे

कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. *आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधान त्यांच्या दर्शनाला जातात. मंदीरे, चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही.*

ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो आहे.

वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते.

*पु.ल.देशपांडे - एक शुन्य मी’*

18/06/2022
17/06/2022

प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी हे जगातले सर्वात बलाढ्य (पॉवरफुल) राष्ट्रप्रमुख असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.प्रत्यक्षात गुजरातमध्ये याच्या उलट चित्र बघायला मिळाले. मोदी निर्माणकर्ता (ओबीसी) समाजाचे आहेत. या तथाकथित सामर्थ्यशाली माणसाचा अजेंडा नागपूरच्या रेशिमबागमधून ठरवून दिला जातो. त्यात स्वल्पविरामाचासुद्धा ज्यांना बदल करण्याचा अधिकार नाही अशी व्यक्ती म्हणजे शेतातले पक्षांना घाबरवण्यासाठी उभे केलेले बुजगावणे नव्हे काय? वाट्टेल ते खा प्या, कोट्यवधी रुपयांचे कपडे घाला, दिवसातून दहाधा फोटोशूट करा. पण ब्राह्मणक्षत्रियवैश्य यांना प्रभू मानणारा शूद्र म्हणून त्यांची सेवाचाक्री करा हा मनुचा आदेश मोदीजी इमानेइतबारे पाळतात म्हणून ते या पदावर आहेत.
याचा पुरावा देतो. गुजरातीत आरक्षणाला अनामत म्हणतात. राज्यात ओबीसींची संख्या ५२ टक्के असली तरी त्यांना राजकीय आरक्षण मात्र फक्त १० टक्केच आहे. तेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मार्च २०२१ मध्ये संपले असले तरी इंपीरीकल डेटा जमवण्यासाठी मोदी समर्पित आयोग नेमत नाहीयेत. राज्यात अनुसूचित जाती व जमातींना मिळून २२ टक्के आरक्षण असून ५० च्या आत राहण्यासाठी मोदी ओबीसींना २८ टक्के आरक्षण देऊ शकतात पण ५६ च्या अर्धे २८ करायला रेशिंबागेची परवानगी नाही. कारण रेशिमकिडे "आरक्षणमुक्त भारता" चा आदर्श मानतात. ज्यांना स्वकीय, स्वजन हिताचा एकही निर्णय घेता येत नाही ती तर बाहुली असतात. रेशीम बागेचे राष्ट्र फक्त उच्च वर्णीयांचे आहे. ओबीसी फक्त नोकर आहेत. तेव्हा अशा नोकराला, त्रयीवर्णिक सेवकाला पॉवरफुल मानण हास्यास्पद आहे. मागासवर्गीय समाजाच्या नावावर मत मागणारे मोदी या ७३ कोटी निर्माणकर्त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा, बीजली, सडक, पाणी या विकास योजनांसाठी केंद्रीय बजेटमध्ये वर्षाला दरडोई २२ रुपये देतात. वर्षाला एक चहा प्या आणि गप्प बसा असं सांगणारे चहावाले हे पॉवरफुल सोडा सगळ्यात कमकुवत प्रधानमंत्री आहेत असा निर्वाळा इतिहास देईल.
: प्रा. हरी नरके

17/06/2022

तर्क शील पोस्ट.............
गुलाम परजीवी अंगभक्ति वाले दूर रहे

*आस्था झूठ पर टिकी होती है!*
*जो सवालों से ढहने लगती है!!*

#आस्था अज्ञानता से पैदा होती है और #अज्ञानता से अंधविश्वास पैदा होता है, #अंधविश्वास से पाखण्ड पैदा होता है. पहली पीढ़ी की मूर्खता से पैदा हुआ #पाखण्ड दूसरी पीढ़ी की परंपरा बन जाता है *परजीवी* समाज द्वारा फैलाया गया #काल्पनिक चीजों का डर और लालच इन #अन्धविश्वासी परंपराओं को जिंदा रखता है और जब कोई बुद्धिजीवी उस #मूर्खता पर सवाल करता है तो लोगो की भावनाएं आहत होने लगती है।
#चार्वाक* ने कहा कि जीवन चार तत्व से मिलकर बना है पृथ्वी,जल,वायु और अग्नि, जब इंसान मरता है तो सभी तत्व विलीन हो जाते है मरने के बाद जीवन का कोई #अस्तित्व नहीं. इसलिए जब तक जिंदा हो सुख से रहो,
*खाओ पीओ मौज करो*
यानी भौतिक #जीवन को सुखी बनाने को कहा है चार्वाक का लोकायत दर्शन #प्रत्यक्ष प्रमाण को मानता है लोकायत का अर्थ होता है जो लोगों में व्याप्त हो यानी जो विचार समाज में स्थापित हो वही लोकायत है चार्वाक का #अनीश्वरवादी दर्शन को विदेशी क्रूर आस्थावान लोगो ने खत्म कर दिया इसकी #माफी उनकी औलादें कब मांगेगी?

*गौतम बुद्ध ने कहा कि दुनियां को बनाने वाला कोई ईश्वर नहीं यह खुद ही #चलायमान है कोई आत्मा,परमात्मा,पुनर्जन्म नहीं है कोई स्वर्ग,नरक नहीं है उन्होंने बुद्धिज्म में व्याप्त बुराइयों को खत्म किया समाज को #वैज्ञानिक चेतना दी जीवन जीने के लिए सत्य,करुणा और मैत्री का मार्ग दिया लेकिन विदेशी #आस्थावान आक्रांताओं ने हजारों साल तक उनके विचारों के साथ संघर्ष करके भारत से खत्म किया यहां के लोगो को अपनी किताबो में शुद्र घोषित करके शिक्षा और धन से विरक्त कर दिया यहां के बहुसंख्यक बौद्धिष्ट समाज की #संस्कृति बदल दी लेकिन बुद्ध को विश्वगुरु बनने से नहीं रोक सके,दुनियां में बुद्धिज़्म फैलने से नहीं रोक सके,भारत से बुद्धिज्म को मिटाने वाले विदेशी आस्थावान आक्रांता क्रूर समाज अपने पूर्वजो के जुर्म की माफी कब मांगेगा?*

महान कवि *कबीर* ने कहा-

कांकर पाथर जोरि के मस्जिद लिए बनाय!
ते चढ़ मुल्ला बाग दे क्या बहरा हुआ खुदाय!!

जुलाहा कबीर खुदा पर सवाल खड़ा कर रहे हैं लेकिन किसी मुसलमान ने आहत होकर उनकी हत्या नहीं की बल्कि उन्होंने हत्या की जिनके धंधे पर कबीर के कारण बट्टा लग रहा था और बाद में कबीर को ब्राह्मण माता के गर्व से पैदा होना लिखा गया कबीर के नाम से नकली दोहे लिखकर चरित्र हनन किया गया।

महाकवि *रैदास* ने कहा-

*जीवन चार दिवस का मेला रे!*
*बामन झूठा,वेद भी झूठे,झूठे ब्रह्म अकेला रे!!*

*रैदास बाभन मत पूजिये,जो होवे गुन हीन!*
*पूजिये चरन चांडाल के,जो होवे गुन परवीन!!*

रैदास चमार थे वैज्ञानिक वर्ग के थे जिसने समाज को जूता,चप्पल,थैला,कपड़ा और न जाने क्या क्या समाज को बनाकर दिया मानव सभ्यता को आगे बढ़ाया फिर *परजीवी समाज* ने अपनी किताबो में उसी को नीच घोषित कर खुद ऊंच बन गए लेकिन मानव सभ्यता को आगे बढ़ाने में कोई योगदान नहीं दिया इसीलिए रैदास ने जमकर आलोचना की फिर परजीवियों ने उन्हें *रैदास से रविदास* बना दिया और उनकी मूल शिक्षाओं को खत्म कर दिया इसकी माफी *क्रूर आस्तिक परजीवी समाज* कब मांगेगा?

माली जाति के *जोतिराव फुले* ने *गुलामगिरी* किताब लिखकर परजीवियों की चूलें हिला दी तो महार जाति में पैदा हुआ *डॉ. अम्बेडकर* ने *जाति का विनाश* किताब लिखकर परजीवियों की उच्चता की कब्र खोद दी.

गडरिया जाति के *रामास्वामी पेरियार* ने *सच्ची रामायण* किताब लिखकर परजीवियों की आस्था की धज्जियां उड़ा दी भारत में मूलनिवासी बुद्धिज्म की नास्तिक और विदेशी क्रूर आस्तिकों की हजारो साल के संस्कृति संघर्ष का इतिहास है *भारत की नास्तिक और विदेशियों की आस्तिक संस्कृति का टकराव हजारों साल से चल रहा है यह आज का नहीं है अब आस्था का वास्ता देकर,डराकर परजीवी अपनी धार्मिक दुकानों को ज्यादा दिनों तक बचा नहीं पाएंगे यह इनके लूट की आखिरी सदी है।*
#जय मुलनिवासी🙏

16/06/2022

*दाढी फक्त रु १०/-*
------------------------
एक महावितरणमध्ये काम करणारा अधिकारी लॉकडाऊन नंतर दाढी करायला सलूनमधे गेला असता तो दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचतो..

दाढी - फक्त ₹. १०/-
ब्लेड अधिभार - ₹. २/-
वस्तरा भाडे - ₹. ३/-
क्रीम - ₹. ५/-
कात्री भाडे - ₹. ३/-
खुर्ची भाडे - ₹. १०/-
लोशन - ₹. ७/-
पावडर - ₹. ५/-
नॅपकिन भाडे - ₹. ५/-
--------------------------------
एकूण - ₹. ५०/-

बोर्ड वाचून अधिकाऱ्याने विचारले : *“तुम्ही तर कमालच केलीत. दाढी फक्त १० रु. लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची लूट करताय.“*

दुकानदार : *"हा बोर्ड मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत असल्याने तुम्हाला वाचता तरी येतो साहेब. तरीही, तुम्ही मला जाब विचारताय?"*

*"तुमच्या महावितरणकडून अनेक वर्षांपासून आमची महा-फसवणूक सुरू आहे त्याचं काय?*

स्थिर आकार,
वीज आकार,
वीज वहन आकार,
इंधन समायोजन आकार,
वीज शुल्क
वीज विक्री कर,
व्याज,
इतर आकार,
चालू वीज देयक,
थकबाकी,
समायोजित रक्कम,
व्याजाची थकबाकी,
एकूण थकबाकी,
देयकाची निव्वळ रक्कम,... पूर्णांक देयक...

*"हे विज बिल आजपर्यंत किती जणांना कळले ते सांगाल का?"*
😱
(जनतेचे डोळे उघडे पर्यंत शेअर करत रहा,जो पर्यंत जनता लुटवायला तयार आहै तो पर्यंत)

16/06/2022
हा ओबीसी.... मानसिक गुलाम...व्हीडीओ सुध्दा बघा....
16/06/2022

हा ओबीसी.... मानसिक गुलाम...
व्हीडीओ सुध्दा बघा....

Address

Kamala Nehru Nagar Opp Police HQ Akola
Akola
444001

Telephone

+919881731664

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कामगार कायदे ,समस्या व मार्गदर्शन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कामगार कायदे ,समस्या व मार्गदर्शन:

Share